Congress party burden on country says PM Narendra Modi
Congress party burden on country says PM Narendra Modi 
देश

काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले. 

भारतीय जनता संघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भोपाळ येथे भाजपकडून 'कार्यकर्ता कुंभमेळ्या'चे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''विरोधीपक्ष भारतात आघाडी करण्यास समर्थ नाहीत. त्यामुळे ते भारताबाहेर आघाडी करण्यावर लक्ष देत आहे. आता काँग्रेस पक्षाकडे काहीही शिल्लक राहिले नाही. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे झाले आहे''.

दरम्यान, मोदींनी तिहेरी तलाकच्या मुद्यावर काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''एका पक्षाच्या महिला असलेल्या अध्यक्षांनी व्होट बँकेसाठी मुस्लिम महिलांची काळजी केली नाही. समाजातील प्रत्येक महिलांना समानतेचा हक्क मिळायला हवा. यामध्ये कोणताही भेदभाव नसावा. मग कोणी महिला हिंदू असो वा मुस्लिम. मात्र, व्होट बँकेसाठी हे सगळं केले जात आहे''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT