देश

काँग्रेस आर्थिक संकटात; कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला नवनव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता काँग्रेसला पैशांची कमतरता भासत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून विविध विभागांना खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे वृत्त 'इंडिया टुडे'च्या सूत्रांनी दिले आहे.

राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनामा, कर्नाटकमधील आमदारांचे बंड यानंतर काँग्रेस पक्ष आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता पक्षाकडून विविध विभागातील खर्चात कपातीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आली आहे. पक्षाकडून आता सेवादलाला दर महिन्याला 2 लाखांऐवजी दीड लाख रुपये दिले जात आहेत. तसेच पक्षाकडून युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच 'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया'ला (एनएसयूआय) खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

सोशल मीडिया सेलची अवस्था बिकट

काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची अवस्थाही बिकट झाली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीममध्ये 55 कर्मचारी होते. मात्र, आता ही संख्या 20 ने कमी करून आता या टीममध्ये 35 कर्मचारी आहेत. या टीममधील लोकांनाही पगार मिळत नाही.

मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना पगारच नाही

काँग्रेस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर पगारच मिळालेला नाही. काँग्रेस संघटनेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT