sonia gandhi and rahul gandhi  sakal
देश

हायकमांडचा आदेश! काँग्रेसमध्ये राजीनामासत्राला सुरुवात

पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधींनी दिल पाच राज्यांतील पराभवानंतर मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

सुधीर काकडे

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्चला जाहीर झाले. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व निवडणूकांमध्ये काँग्रेसचा (Congress) दारून पराभव झाला आहे. एकूण पाच राज्यांत मिळूनही काँग्रेसला शंभरी पार करता आलेली नाही. त्यानंतर पक्षाने काही मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सोनिया गांधींनी पंजाबचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, उत्तर प्रदेशचे अजय लल्लू, उत्तराखंडचे गणेश गोदियाल, गोव्याचे गिरीष चोडणकर आणि मनिपुरच्या एन. लोकेन सिंह यांना राजीनामे मागितले आहेत.

सोनिया गांधींच्या आदेशानंतर उत्तराखंडचे काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी आज राजीनामा सादर केला आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT