congress social media Propaganda
congress social media Propaganda sakal
देश

Congress Propaganda : काँग्रेसचा प्रचार खर्चासाठी हात आखडता; ‘पारंपरिक’ऐवजी डिजिटल माध्यमांवर भर

अजय बुवा

नवी दिल्ली - सरकारी यंत्रणेने बॅंक खाती बंद केल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या काँग्रेसने प्रचार खर्चासाठी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा भर पारंपरिकऐवजी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रचारावर असेल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील प्रचारासाठी जाहिरातीचे ३ हजार ५०० स्पॉट तयार करण्यात आले आहेत. याखेरीज वृत्तवाहिन्यांवर असलेल्या राजकीय दबावामुळे मुलाखतींसाठी आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी युट्यूब चॅनेलना प्राधान्य द्यावे अशा सूचनाही पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.

आर्थिक कोंडीचा काँग्रेसच्या प्रचार मोहिमेवर परिणाम झाल्याची कबुली पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. हिमाचल प्रदेश वगळता आर्थिक रसद पुरवठ्यासाठी काँग्रेस पक्ष दक्षिणेतील दोन राज्यांवर अवलंबून आहे.

प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला बजावलेली १७०० कोटी रुपयांची नोटीस आणि बॅंक खाती बंद राहिल्यामुळे पक्षाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे, असे निरीक्षण काँग्रेसच्या एका नेत्याने नोंदविले.

काँग्रेसची ८ कोटी न्यायपत्रे

काँग्रेसने पाच न्याय आणि २५ हमी (गॅरंटी) असलेला जाहीरनामा मागील आठवड्यात प्रसिद्ध केला होता. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील हा जाहीरनामा प्रादेशिक भाषांमध्येही तयार केला जाणार आहे. शिवाय, ८ कोटी न्यायपत्रे (गॅरंटी कार्ड) काँग्रेसने हिंदी, इंग्रजीसह तमीळ, मल्याळम, तेलुगू, मराठी, कन्नड, गुजराती, उडिया, बंगाली, पंजाबी, आसामी, उर्दू या भाषांत छापली आहेत. ही हमी पत्रे भरून घेण्याच्या निमित्ताने घरोघरी पक्षाचा प्रचार करण्याचेही नियोजनही काँग्रेसने केले आहे.

प्रचारफलकांना कात्री

सत्ताधारी भाजपकडून केवळ ‘गुगल’ आणि ‘मेटा’ यासारख्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. परंतु काँग्रेसला मर्यादित आर्थिक बळावर प्रचार करावा लागत असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने प्रचार फलकांवरील जाहिराती प्रसिद्ध केलेल्या नाहीत.

जाहिरातींवरही परिणाम

काँग्रेसच्या एकूण प्रचार खर्चापैकी २५ टक्के खर्च वर्तमानपत्रांमधील जाहिरातींवर होत असे. यावेळी हा खर्च केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत वर्तमानपत्रांना केवळ तीन जाहिराती दिल्या असून त्याही काही इंग्रजी आणि प्रादेशिक वर्तमानपत्रांनी छापलेल्या नाहीत. इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांसाठी २५ सेकंदांचे ३५०० स्पॉट्स नोंदविण्यात आले आहेत. त्यातून पक्षाचा जाहीरनामा आणि धोरणांचा प्रचार केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT