Rahul Gandhi Narendra Modi Sakal
देश

मोदींची घराणेशाहीवर टीका; राहुल गांधींची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ

घराणेशाहीविरोधातल्या लढ्यात मला साथ द्या, असं आवाहन आज मोदींनी लाल किल्ल्यावरुन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज जल्लोषाचं वातावरण आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे. यावरुन आता विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपल्या नवव्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं की, भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही माध्यमांनी याविषयी विचारणा केली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी आज या गोष्टींवर भाष्य करणार नाही. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधीही गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवरुन टीका केली होती. ते म्हणाले होते की, घराणेशाही असलेले पक्ष म्हणजे एकाच कुटुंबातल्या अनेक लोकांनी राजकारणात येऊ नये असं म्हणत नाही. योग्यतेच्या आधारे, जनतेच्या आशीर्वादाने एका कुटुंबातील अनेक लोक राजकारणात यावेत. यामुळे पक्षात घराणेशाही सुरु होत नाही. पण पक्षाची सूत्रे एकाच घराण्याच्या हातात पिढ्यानं पिढ्या असेल तर ती घराणेशाही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: तुमचं लक्षही नव्हतं अन् लोकसभेत ३ मिनिटांत मोठा निर्णय! २:१२ ला सादर, २:१५ ला मंजूर; प्रत्येकाच्या कामाची माहिती

Women's Asia Cup: महिला आशिया करंडकाबाबत संभ्रम; अजून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

DY Patil Story: एका पराभवाने सोडलं राजकारण अन् बनले शिक्षणमहर्षी! डॉ. डी. वाय पाटील यांची प्रेरणादायी वाटचाल

Latest Marathi News Live Update : आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद

Amravati Kidney Donation: सासूने किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन; शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ७५ वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

SCROLL FOR NEXT