balasaheb-thorat 
देश

राजीनामा देण्याची बाळासाहेब थोरातांची तयारी?;चर्चेला राज्यात उधाण

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, संघटनात्मक कामात श्रेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे नाराज थोरात यांनी दोन महिने आधीच राजीनाम्याची तयारी दर्शविल्याचे कळते. दरम्यान, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील संभाव्य नेतृत्वाबदलाबाबत आज (ता. ५)  राज्यातील काँग्रेस आमदारांची व्यक्तिशः मते जाणून घेणार असल्याचेही समजते. 

काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणमधील नेतृत्व बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्याकडे विधीमंडळ पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षपद आहेत. तर तेलंगणचे उत्तमकुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी प्रदेशाध्यक्षपद मिळालेल्या थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्षाचे नेतेपद आणि मंत्रीपदही आहे.

 त्यामुळे एक व्यक्ती एक पद या धोरणाची अंलमबजावणी व्हावी, यासाठी पक्षातून आग्रह सुरू झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख व मंत्री नितीन राऊत, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT