Congress will have to search through a telescope says BJP President Amit Shah
Congress will have to search through a telescope says BJP President Amit Shah 
देश

काँग्रेसला आता दुर्बिणीतून शोधावं लागेल : अमित शहा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) माहिती नाही, की 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे आता तुमच्या पक्षाला दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा पक्ष बनला आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर आज (शनिवार) निशाणा साधला.

मध्य प्रदेशातील मोरेना येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शहा बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आज झालेल्या सभेत अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, ''राहुल गांधींच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) माहिती नाही, की 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव होत आहे. त्यामुळे आता तुमच्या पक्षाला दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा पक्ष बनला आहे. काँग्रेस पक्ष खोटं बोलण्याचे एटीएम बनले आहे''. तसेच अन्यायाविरोधात लढण्याचे मोरेना येथील लोकांच्या राहणीमानात आता आले आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT