Pockets are being emptied under the name of 'Offer'
Pockets are being emptied under the name of 'Offer' Sakal
देश

ग्राहकराजा जागा हो! ‘ऑफर’च्या नावाखाली रिकामा होतोय खिसा

सुहास सदाव्रते

सण-वार, उत्सवाच्या निमित्ताने महाधमाका, सेल, ऑफरच्या नादात ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. वस्तू खरेदी केल्याची पक्की पावती न घेणे यासह अनेक बाबतीत ग्राहकाची (Customer) सर्रास लूट चालू आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाची (National Consumer Disputes Redressal Commission-NCDRC) आकडेवारी पाहता तक्रार देण्यासाठी नागरिकांत उदासीनता दिसून येत आहे, हे विशेष.

जालना जिल्ह्याची उद्योग नगरी, बियाणे नगरी यासह द्राक्ष बागायतदार म्हणून ओळख आहे. बाजारातील आर्थिक उलाढाल कोटींच्या घरात असते. दुसरीकडे एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकाने त्याची पक्की पावती घेणे ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक असते. परंतु अनेक महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड, किराणा, लोखंड, औषधी, पेट्रोल- डिझेल, मॉल, सेल मधील वस्तूंची खरेदी करताना ग्राहक फारशी पक्की पावती घेत नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सण वार, उत्सवादरम्यान अनेक सेल (Sale), ऑफर (Offer), महाधमाका अशा ग्राहकांना भुलवून टाकणाऱ्या जाहिराती ग्राहकांचा खिसा रिकामा करतात.(Pockets are being emptied under the name of 'Offer')

शहर व जिल्ह्यातील विविध उद्योग, व्यापार,दुकाने,किराणासह, मेडिकल दुकानावर गर्दी कमी होत नाही, अशांपैकी अनेक ठिकाणी ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याचे जिल्हा ग्राहक पंचायतीचे म्हणणे आहे. ग्राहक पंचायत ‘जागो ग्राहक जागो’ अभियान राबविते,परंतु याकडेही नागरिक काणाडोळा करतात, असाही ग्राहक पंचायतीचा अनुभव आहे. किराणा बाजारात सध्या गोडेतेलाची एक ऑफर सुरू आहे, यात एक लीटर बॅगची एमआरपी २१० रुपये दाखवून अनेक दुकानदार ऑफर म्हणून १६० रुपयाची जाहिरात करतात, या ग्राहकांना फायदा तर होत नाही, उलट ग्राहकाची फसवणूक होत असल्याचे ग्राहक पंचायतचे सदस्यांनी अनुभव सांगितला. यातील दुसरी घटना म्हणजे, मेडिकल वरील एका सलाईनची कमाल किंमत ६० रुपये आहे. याची मूळ किंमत यापेक्षा कमी असते,असाही अनुभव एका औषधी दुकानदाराने सांगितला.कुठलाही दुचाकी,चारचाकी वाहनचालक पेट्रोल- डिझेल भरल्यानंतर पक्की पावती,घेतो हाच प्रश्न आहे. एक लीटर पेट्रोल खरच येते की, त्यातही फसवणूक होते याचा फारसा विचार न करता पेट्रोल डिझेल भरले जाते. एखादी वस्तू खरेदी केली की,जीएसटीनुसार पावती द्यायची असेल तर ग्राहकाला जास्त पैसे आकारले जातात, परिणामी ग्राहक पक्की पावती घेत नाहीत, असा काही इलेक्ट्रॉनिक दुकानांमधला अनेकांचा अनुभव आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सहा वर्षातील तक्रारीची संख्या पाहता खूपच कमी आहे.शहरातील असलेल्या या आयोगाकडे पीकविमा,गृहनिर्माण सोसायटी,मेडिकल, बँकेची प्रकरणे अशा तक्रारी येतात.तीन वर्षात तक्रार निवारण आयोगाकडे ग्राहक,दुकानदार,व्यापारी यांच्या उदासीनतेमुळे ३८६ तक्रारी प्रलंबित असल्याची आकडेवारी सांगते

आम्ही ग्राहकांना दक्ष करण्याचा प्रयत्न करतो.अनेकदा वस्तूची पक्की पावती कुणी घेत नाही,नंतर तक्रार देण्यासाठी येतात.सेल,धमाका,डिस्काउंट यात ग्राहक आकर्षित होतो,परंतु नुकसान कळत नाही.शहरात ग्राहक जनजागृती चळवळ सुरु करणार आहोत.

- मोहन इंगळे, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत

ऑनलाइन माहिती, मोबाईलमुळे ग्राहक सजग झाले आहेत. चार ठिकाणी वस्तूचे भाव पाहतात. कापड, किराणा इतर ठिकाणी जीएसटीनुसार बिले दुकानदार देतात. सर्वच बाबतीत स्पर्धा वाढल्याने दुकानदाराला सावध राहावे लागते. अर्थात ग्राहकांची कुठलीही फसवणूक होऊ नये म्हणून व्यापारी, संघटना खबरदारी घेतात.

- सतीश पंच, व्यापारी, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT