Coromandel Express Accident  
देश

Coromandel Express Accident : राष्ट्रपती मुर्मू व मोदींनी व्यक्त केला शोक, राहुल गांधींचे काँग्रेस कार्यकर्त्यांना मदतीचे आदेश

Sandip Kapde

Coromandel Express Accident : ओडिशातील बालासोर येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला असून त्यात आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २०० जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे. अंगावर काटा येईल येवढा मोठा हा अपघात आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बालासोर येथे झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती ती मनापासून संवेदना व्यक्त करते. बचावकार्य यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करण्यासोबतच अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित असल्याचे म्हटले आहे. जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. मोदी म्हणाले, रेल्वेमंत्र्यांशी (अश्विनी वैष्णव) बोललो आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी त्यांचे कुटुंब गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो." यासोबतच राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बचाव कार्यात सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

SCROLL FOR NEXT