Schools Sakal Media
देश

कोरोनाकाळात विद्यार्थांवर मानसिक परिणाम; सरकारकडून होणार सर्वेक्षण

सर्वेक्षण मुलांचे पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या आधी होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.

दत्ता लवांडे

दिल्ली : कोरोनामुळे देशातील सर्वच घटकांवर परिणाम झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे. गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने लहान मुलांवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या वैचारिक आणि बुद्धीमत्तेवर परिणाम झाल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. या काळात झालेल्या बदजलांवर अभ्यास करण्यासाठी सरकार 'कोरोनामुळे लहान मुलांवर मानसिक आणि भावनिकरित्या झालेला परिणाम' या विषायावर सर्वेक्षण करणार आहे. हे सर्वेक्षण मुलांचे पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या आधी होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. (Effect On Student Mentality In Corona And Lockdown)

मागच्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलं घरी बसून आहेत. या काळात लहान मुलांवर झालेले मानसिक आणि भावनिक बदल जाणून घेण्यासाठी मोठ्या पातळीवरील सर्वेक्षण करण्यात येणार आहे असे सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. या सर्वेक्षणाचा फायदा मुलांच्या शाळेतील वागणुकीत बदल करण्यासाठी होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. शैक्षणिक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ह्या सर्वेक्षणाचे काम पहिल्या टप्प्यात असून त्यावर काम सुरु आहे. तसेच सरकारने सोपवलेल्या सर्वेक्षणाचा आराखडा तयार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी केंद्राचा शिक्षण विभाग आम्हाला मदत करेल. तसेच हा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला असल्याने हे काम पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरलेला नाही. पण हे काम मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी पूर्ण करायचे असल्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना काळातील झालेल्या परिणामावर अभ्यास करण्यासाठी आणि या आव्हानात्मक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हे सर्वेक्षणातील मुद्दे कामी येतील. तसेच शैक्षणिक काळात विद्यार्थांच्या मानसिकतेत विकास होण्यासाठी, तणावमुक्त आणि स्वातंत्र्य वैचारिक बुद्धीमत्तेचा विकास होण्यासाठी, शाळेत शिक्षक आणि विद्यार्थांमधील सुसंवाद घडवून आणण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरेल असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT