corona update guidelines 
देश

Corona Update - केंद्र सरकारकडून नव्या गाइडलाइन्स जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आता लॉकडाऊनमधील आणखी काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सिनेमागृहे जास्त क्षमतेनं सुरू करता येणार आहेत. तसंच स्विमिंग पूलसुद्धा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

गाइडलाइन्स 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या असून त्या 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील. 

कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून सार्वजनिक कार्यक्रमांना परवागनी असणार आहे. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र यासाठी बंदी असेल. परवानगी शिवाय अशा कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. 

भारतातील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या 24 तासात देसात 12 हजार 689 नवे रुग्ण आढळले असून 137 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी 13 हजार 320 नवी रुग्ण आढळले होते. सध्या देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 6 लाख 90 हजार इतकी झाली असून आतापर्यंत एक लाख 53 हजार 724 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्यासुद्धा कमी होऊन ती 1 लाख 76 हजार इतकी झाली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT