ppe kit ANI
देश

'पॉझिटिव्ह' सासू नको गं बाई; कोरोना व्हावा म्हणून सूनेला मिठी

कार्तिक पुजारी

कोरोनाची महामारी पसरल्यापासून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार तेलंगानामध्ये समोर आला आहे

नवी दिल्ली- कोरोनाची महामारी पसरल्यापासून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार तेलंगानामध्ये समोर आला आहे. सासूने आपल्या सूनेला कोरोना संक्रमित करण्यासाठी तिला आलिंगन दिले आहे. महिलेला कोरोना झाला होता. त्यामुळे तिला विलगिकरणात ठेवण्यात आले होते. एकटं राहून ही महिला कंटाळली होती. शिवाय घरचे तिच्याजवळ येत नव्हते. यातून आलेल्या रागातून तिने सूनेलाही कोरोना पॉझिटिव्ह करण्याचा निर्धार केला. यावेळी जेवण घेऊन आलेल्या सूनेची महिलेने गळाभेट घेतले. (corona infected women hugging daughter in law telangana)

सूनेमध्ये दोन दिवसांनी कोरोना सदृष्य लक्षणं दिसून आली. चाचणी केल्यानंतर सूनेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेला घराच्या बाहेर हाकलण्यात आल्याचं समजतय. त्यानंतर महिलेच्या बहिणीने तिला राजन्ना सिरसिला जिल्ह्यातील थिम्मापूर गावातील आई-वडिलांच्या घरी नेलं. सूनेने द टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सासूला वेगळे ठेवण्यात आले होते. याकाळात कोणीही तिच्याजवळ जात नव्हतं. यामुळे सासूच्या मनात राग होता. सूनेने एका व्हिडिओ मुलाखतीत आरोग्य अधिकाऱ्याला सांगितलं की, माझ्या सासूने म्हटलं की मलापण कोरोना व्हायला पाहिजे, असं म्हणत तिने मला आलिंगन दिले.

सूनेने सांगितलं की, 'सासूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला स्वतंत्र ठेवण्यात आले होते. तिथेच तिला जेवण दिले जात होते, नातवांनाही तिच्याजवळ जाऊ दिले जात नव्हते. याचमुळे सासूला वाटायचं की मलापण कोरोना संक्रमण व्हावं. 'मी मेल्यानंतर तुम्हाला सुखानं राहायचं आहे का?' असं म्हणत तिने मला आलिंगन दिले.' दरम्यान, सूनेवर सध्या उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT