corona vaccination esakal
देश

कोरोना : 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण कधी होणार?

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि प्रौढांचे लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. देशात 12-14 वर्षे वयोगटातील अंदाजे लोकसंख्या 7.5 कोटी आहे. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलांची लोकसंख्या देखील तितकीच आहे, ज्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांची माहिती

सोमवारी, केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे (NTAGI) अध्यक्ष डॉ एनके अरोरा म्हणाले होते की, भारतात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये सुरू होऊ शकते. मार्चपर्यंत १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले होते. अशा स्थितीत पुढील टप्प्यात 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करणे अपेक्षित आहे.

12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण कधी होणार?

डॉ. अरोरा यांच्या मते, देशात 15-18 वयोगटातील 7.5 कोटी लोक आहेत. यापैकी 3.45 कोटी तरुणांना कोरोनाची लस मिळाली आहे. किशोरवयीन मुलांना Covaxin दिले जात असल्याने, त्यांना 28 ते 42 दिवसांत लसीचा दुसरा डोसही दिला जाईल. म्हणजेच 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण होईल. यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण जोरात सुरू करता येईल. 12 ते 14 वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोनाविरोधी लसीकरण सुरू करण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने अद्याप घेतलेला नाही.

किशोरवयीन मुलांना फेब्रुवारीमध्ये दुसरा डोस

डॉ. अरोरा यांच्या मते, १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुले लसीकरण प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होत आहेत आणि लसीकरणाचा हा वेग पाहता, या वयोगटातील उर्वरित लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर त्याचा दुसरा डोस फेब्रुवारीच्या अखेरीस देणे अपेक्षित आहे. अरोरा म्हणाले की 15-18 वर्षे वयोगटाचे लसीकरण झाल्यानंतर, 12-14 वर्षे वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी सरकार मार्चमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT