corona patient celebrate wedding ceremony at kerla covid center video viral
corona patient celebrate wedding ceremony at kerla covid center video viral 
देश

Video: कोव्हिड सेंटरमध्ये पार पडला विवाह

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम (केरळ): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. अनेकजण उपचारासाठी दाखल होत असून, एका रुग्णाचा कोव्हिड सेंटरमध्ये विवाह सोहळा पार पडला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोरोनामुळे विवाह मोजक्याच नागरिकांच्या उपस्थित पार पाडला जात आहे. एका युवतीचा विवाह ठरला होता. विवाहाची तारीख काढण्यात आली होती. पण, तिला कोरोनाची लागण झाली आणि उपचारासाठी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागले. ठरलेल्या तारखेलाच विवाह व्हावा, अशी वधू-वरांची इच्छा होती. दोघांच्या इच्छेखातर ठरवलेल्या वेळीच विवाह करण्याचे ठरवले. कोव्हिड सेंटरला रुग्णांनी अक्षरश: लग्नमंडपाचे रूप आणले. कोव्हिड सेंटरमध्ये तिच्यासह असलेले इतर कोरोना रुग्णच तिचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी झाले आणि त्यांनी तिच्या विवाहात धम्माल केली. नवरीच्या भोवती फिरत, गाणं गात, नाचत त्यांनी तिचा उत्साह वाढवला. शिवाय, तिच्यासोबत छायाचित्रेही काढली. कोरोनाव्हायरस झाला म्हणून कुणाचं आयुष्य थांबत नाही की आयुष्यातील मौजमजा थांबत नाही. उलट एका नव्या आयुष्याला सुरुवात करता येते, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे. एर्नाकुलममधील कोव्हिड सेंटरमधील विवाहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT