covishield 
देश

Corona Update - देशात 11 दिवसांत 10 लाख नवे रुग्ण; रिकव्हरी रेट दिलासादायक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भारतात रुग्णवाढीचा आलेख चढता असला तरी त्यासोबत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. तसंच मृत्यूदरही इतर देशांपेक्षा कमी आहे. शनिवारच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकलं आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 42 लाखांहून अधिक आहे. तर अमेरिकेत वर्ल्डोमिटरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 41 लाख 91 हजार 894 इतकी आहे. तर भारतात 42 लाख 5 हजार 201 इतके रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक अशीच आहे. भारतात शुक्रवारी एका दिवसात 93 हजार 337 नव्या रुग्णांची भर पडली. तसंच 1247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 53 लाख 08 हजार 15 इतकी झाली आहे. सध्या भारतात 10 लाख 13 हजार 964 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 42 लाख 8 हडार 432 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे एकूण 85 हजार 619 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 67 लाख 25 हजार 941 इतकी असून यापैकी 41 लाख 91 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 2 लाख 3 हजार 171 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत 25 लाख 30 हजरा 876 कोरोनाबाधित आहेत. या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात एकूण कोरोना बाधितांची संख्या 53 लाखांहून अधिक आहे. यात 10 लाखांपेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. 

11 दिवसात 10 लाख रुग्ण
भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग वाढत असून 21 दिवसात 10 लाख ते 20 लाखांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर पुढच्या 16 दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 30 लाखांवर पोहोचला होता. दिवसेंदिवस कमी वेळेत भारतात 10 लाख रुग्ण वाढत आहेत. 13 ते 40 लाख ही आकडेवारी भारताने 13 दिवसात गाठली. तर पुढच्या 10 लाखांची संख्या फक्त 11 दिवसात गाठली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात 16 सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या एकूण 6 कोटी 5 लाख 65 हजार 728 चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 11 लाख 36 हजार 613 जणांची चाचणी बुधवारी करण्यात आली होती. दरम्यान, मृतांच्या आकडेवारीबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने असंही सांगितलं की, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांपैकी 70 टक्के लोकांना इतर गंभीर आजार होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT