Corona Update
Corona Update 
देश

Corona Update : भारतात आढळले नव्या स्ट्रेनचे सहा रुग्ण; गेल्या 24 तासांत 252 रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 16,432 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,02,24,303 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,900 बरे झाले आहेत.

या नव्या बरे झालेल्या रुग्णांसह आजवरच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 98,07,569 वर पोहोचली आहे. सध्या देशात 2,68,581 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 252 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह एकूण मृतांची संख्या ही 1,48,153 वर जाऊन पोहोचली आहे. 

काल 28 डिसेंबर अखेर 16,98,01,749 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. यातील 9,83,695 चाचण्या काल सोमवारी करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. 

काल महाराष्ट्रात 2,498 नवे रुग्ण सापडले आहेत. तर काल 4,501 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. काल महाराष्ट्रात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 19,22,048 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 18,14,449 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात 57,159 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. 

भारतात आढळला नवा कोरोना स्ट्रेन

ब्रिटनमधला नवा स्ट्रेन भारतात आढळून आला आहे. एकूण सहा रुग्णांच्या शरीरात करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT