Corona Test sakal media
देश

देशात २४ तासात नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के वाढ

सकाळ डिजिटल टीम

देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरण करण्यात आले असून तब्बल दोन कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आली.

नवी दिल्ली - देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरण करण्यात आले असून तब्बल दोन कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आली. तर गेल्या २४ तासात देशात ३५ हजार ६६२ नवीन रुग्ण सापडले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के इतकी वाढ झाली. दिवसभरात ३३ हजार ७९८ जण बरे होऊन घरी परतले. देशात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ६३९ इतकी आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.०२ टक्के इतकं आहे.

देशात दैनंदिन संसर्ग दर हा २.४६ टक्के इतका आहे. गेल्या १९ दिवसांपासून हा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर आठवड्याचा ससंर्ग दर हा २.०२ टक्के असून तो ८५ दिवसांपासून ३ टक्क्यांच्या खाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या २४ तासात देशात ३५ हजार ६६२ नवे रुग्ण सापडले असून ३३ हजार ७९८ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात कोरोनामुळे २८१ जणांनी प्राण गमावले. आतापर्यंत देशात ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० जणांना कोरोनाची लागण झाली. तर ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत देशात ४ लाख ४४ हजार ५२९ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT