corona vaccines representative image
देश

मुलांच्या लसीकरणाला मोठा प्रतिसाद, पहिल्याच दिवशी लाखोंची नोंदणी

सुशांत जाधव

देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे धास्ती निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवून मोठा दिलासा दिला आहे. 3 जानेवारी 2022 पासून लहान मुलांचे लसीकरण (corona vaccines) सुरु केले जाणार आहे. या टप्प्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या दिवशी यासाठी नाव नोंदणीला सुरुवात झाली. कोविन (CoWIN) अ‍ॅपवर पहिल्या दिवसापासून याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी अडीच लाखांहून अधिक मुलांनी लशीसाठी नाव नोंदणी केली आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या सुचनेनुसार, ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्याआधी झाला असेल अशा मुलांना 3 जानेवारीपासून लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तत्पूर्वी या गटातील मुलांना CoWIN या पोर्टलवर नाव नोंदणी करणं गरजेच आहे. आधार कार्डशिवाय मुलांना आयकार्डचा वापर करुन नाव नोंदणी करता येईल. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लशींना मंजुरी दिली आहे. यात भारत बायोटेकची कोवॅक्सिनची निवड केल्यास याचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D हे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.

कोविन पोर्टलवर नोंदणी कशी करायची?

*कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन App लसीकरणासाठी नोंदणी करणं प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. यामुळे तुम्हाला लसीकरण केंद्र, तारीख आणि वेळ हा स्लॉट बूक होतो.

*CoWIN वेबसाईटला भेट दिल्यानंतर उजव्या कोपऱ्यात Register / Sign in yourself हा पर्यात उपलब्ध आहे. या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे लागेल.

*त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्ही जो मोबाईल नंबर देणार तो तुमच्या वापरातील असावा जेणेकरून त्यावर प्राप्त होणाऱ्या OTP नं तुम्ही पुढची प्रक्रिया सहज करु शकता.

*Register for Vaccination ची विंडोवर तुम्हाला जी माहिती भरायची आहे त्यात फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी ही माहिती तुम्हाला भरायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर Register पर्यायावर क्लिक करायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT