Delta Variant
Delta Variant Google file photo
देश

डेल्टा प्लस व्हेरियंटची चिंता नको; सरकारचं स्पष्टीकरण

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच नवा व्हेरियंट डेल्टा प्लसमुळं सध्या अनेकांना धडकी बसली आहे. मात्र, या व्हेरियंटमुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कारण हा व्हेरियंट मार्च महिन्यापासून युरोपात अस्तित्वात होता, याच्या प्रसारावर नजर ठेवली जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ. पॉल म्हणाले, "हा विषाणू डेल्टा किंवा बीटा १.६१७.२ या कोरोना विषाणूमध्ये बदल होऊन तयार झाला आहे. डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच व्हेरियंट कारणीभूत होता. डेल्टा व्हेरियंटपासून हा तयार झाला आहे. १३ जून रोजी याबाबत माहिती सार्वजनिक करण्यात आली होती. या व्हेरियंटमुळं घाबरण्याचं कारण नाही. उपलब्ध डेटानुसार, हा व्हेरियंट मोनोक्लोनल अँटिबॉडीला निष्क्रिय करतो. या व्हेरियंटवर अजून अभ्यास केला जात आहे.

सावधानतेची गरज

कोरोनचा हा नवा व्हेरियंट २०२० च्या तुलनेत जास्त हुशार आहे. त्यामुळं आपल्याला जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपल्याला जास्त सोशल डिस्टंसिंगचं पालन करायला हवं. मास्क सातत्यानं वापरावा लागणार आहे. जर मास्क वापरला नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, असंही पॉल यांनी म्हटलं आहे. तर आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले, "लोकांना आता विनाकारण प्रवास करण्यापासून खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. पण लोकांना तरीही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे."

डेल्टा प्लस बाबत महत्वाची बाबी

डेल्टा किंवा बीटा १.६१७.२ व्हेरियंटमध्ये म्युटेशनमुळे नवा डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. या व्हेरियंटमुळं आजार किती गंभीर होईल हे कळून येत नाही. डेल्टा प्लस किंवा AY.1 या व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा परिणाम होत नाही. याची खूप अधिक प्रकरण समोर न आल्यानं हा अद्याप भारतात चिंतेचा विषय नाही. इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, तिथे डेल्टा प्लस व्हेरियंटचे ६३ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी सहा जण भारतीय आहेत. डेल्टा स्ट्रेन बी.१.१६१७.२ च्या स्पाइकमध्ये ४१७ एन प्रोटीनचं म्युटेशन झालं आहे. हा म्युटेशन बीटा व्हेरियंट १.३५१ मध्ये देखील होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT