जमीन खरेदी व्यवहाराचा राम मंदिर ट्रस्टकडून तपशील जाहीर!

जमीन घोटाळ्याच्या आरोपांना ट्रस्टनं सविस्तर दिलं स्पष्टीकरण
ram temple
ram temple

नवी दिल्ली : अयोध्येतील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या कथीत घोटाळ्यातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता राम जन्मभूमी ट्रस्टने मंगळवारी एक निवेदन जाहीर करत स्पष्टीकरण दिलं आहे. या निवदेनात ट्रस्टने जमीन खरेदी प्रकरणातील कराराचा संपूर्ण तपशील सादर केला आहे. (Ram temple Trust releases purchase details of Ayodhya land deal)

निवेदनात राम जन्मभूमी ट्रस्टनं म्हटलं, "या डील आणि वाटाघाटींमध्ये नऊ लोकांचा समावेश होता. जमीन खरेदी व्यवहाराला या सर्वांची मंजुरी होती त्यानंतरच हा करार पारदर्शी पद्धतीनं पूर्ण करण्यात आला. त्याचबरोबर ट्रस्टनं हे ठरवलं होतं की, या डीलमधील सर्व आर्थिक व्यवहार हे बॅंकिंग प्रक्रियेच्या माध्यमातून व्हावेत, त्यानुसार झालेला हा संपूर्ण व्यवहार 'ऑन रेकॉर्ड' आहे"

ट्र्स्टनं म्हटलं की, ही जमीन खरेदी करण्यात ट्रस्टला रस होता. पण तत्पूर्वी आधीचे सर्व करार अंतिम करणं गरजेचं होतं कारण त्यानंतरच जमीनीचा मालकी हक्क निश्चित होऊ शकणार होता. या व्यवहारात गेल्या दहा वर्षांपासून ९ व्यक्तींचा सहभाग होता. या ९ व्यक्तींपैकी ३ व्यक्ती या मुस्लिम होत्या. या सर्व ९ व्यक्तींनी एकत्र बसून आपले जुने करार मार्गी लावण्याचं निश्चित केलं. त्यानंतर या सर्वांच्या मंजुरीनंतरच या जमीन व्यवहाराबाबत तडजोड करण्यात आली. त्यानंतर या जमिनीच्या अंतिम मालकांसोबत पारदर्शी पद्धतीने करार करण्यात आला.

काय आहे व्यवहार ?

जमीन खरेदी कराराचा इतिहास सांगताना ट्रस्टनं म्हटलं की, १८ मार्च रोजी रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी २४३, २४४ आणि २४६ क्रमांकाचे भूखंड सेल डीडद्वारे २ कोटी रुपयांना विकत घेतले. (सर्कल रेटनुसार ५.८० कोटी रुपये आणि मुद्रांकाचे ५.८० कोटी रुपयेही त्यांनी भरले) त्याच दिवशी या दोघांनी ही जमीन रामजन्मभूमी ट्रस्टला विकण्याचा करार केला. याची मान्यताप्राप्त रक्कम १८.५० कोटी रुपये होती. यांपैकी १७ कोटी रुपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे देण्यात आले. त्याचबरोबर राम मंदिर ट्रस्टने निवेदनात असंही म्हटलंय की, संबंधीत जमीन ही मोक्याच्या ठिकाणी आहे. अयोध्येत असलेल्या बाजारभावापेक्षा खूपच कमी किंमतीत ही जमीन त्यावेळी विकत घेण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com