देश

पान खाल्ल्यानं कोरोना होत नाही? जाणून घ्या सत्य

नामदेव कुंभार

कोरोनोच्या (COVID-19) दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवलाय. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. ऑक्सिजन, बेड आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा जीव गेलाय. अशा भितीच्या वातावरणात सोशल मीडियावर कोरोना बचावाचे अनेक उपाय सांगितले जात आहे. लोक याची कोणतीही शाहनिशा करत विश्वास ठेवत आहे. पण सोशल मीडियावर फिरणारा प्रत्येक मेसेज खरा असेल, असे नाही. आमुक खाल्ल्यानं, तमुक पिल्ल्यानं कोरोना होणार नाही, अशा प्रकारचे अनेक मेसेज अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. अशाच पद्धतीचा पानासंदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आलाय की, पान खाल्ल्यानं कोरोना होत नाही. तसेच पान खाल्ल्यानं कोरोनामुक्तही होतं. पीआयबी (PIB) फॅक्ट चेक टीमने व्हायरल होणाऱ्या या मेसेजची पडताळणी केली. (coronavirus in india fake news betel leaf covid 19 pib fact check)

पीआयबीनं (PIB) पानासंदर्भात व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीनं (PIB) ट्विट करत दावा फेटाळलाय. तेसच असं कोणतेही वैज्ञानिक कारण नसल्याचेही म्हटलं आहे. अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी करण्याचा सल्लाही दिला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमीत मास्क (Mask) वापरा, सोशल डिस्टन्सिचा वापरा करा आणि नियमीत हात धुवा.... अशी सूचनाही पीआयबीकडून (PIB) करण्यात आली आहे. पीआयबीचं ट्विट ......

सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोरोना महामारी (COVID-19) रोखण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. काही लोकं यावर डोळं झाकून विश्वास ठेवतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बाब खरीच असेल असं नाही. त्यामुळे कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य पडताळून पाहावं. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. यामध्ये अनेक अफवा या कोरोनावरील उपचारांशी निगडीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची शहानिशा व सत्यता पडताळल्याशिवाय उपाय करु नका, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT