coronavirus vaccine oxford serum institute adar poonawalla tweet 
देश

कोरोना लस : 80 हजार कोटी उपलब्ध होतील का? आदर पुनावालांचा प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

Coronavirus Vaccine: कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार? लस पहिल्यांदा कोणाला दिली जाणार? लस मोफत मिळणार की पैसे द्यावे लागणार? लस महाग असेल का? असे अनेक प्रश्न सध्या जगातल्या प्रत्येकाला पडले आहेत. भारतातही कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार यावर चर्चा सुरू आहे. त्यातच लस सरकारकडून देण्यात येईल, असं यापूर्वीच जाहीर करण्यात आलंय. पण, सरकारला या लसीकरणासाठी किती खर्च येईल? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. 

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरसवरील लशीचं संशोधन सुरू आहे. जगभरात त्याच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या औषध निर्माण संस्थेशी ऑक्सफर्डचा करार झाला असल्यामुळं पुण्यात सीरममध्ये या लसीचं उत्पादन होत आहे. भारतातही या लशीच्या पुढच्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी लशीच्या किमती संदर्भात यापूर्वीही वक्तव्य केली आहेत. लस माफक दरात उपलब्ध होईल, लस सरकारच्या वतीने देण्यात येईल, भारतीयांना लस देण्यात प्राधान्य दिले जाईल, असं यापूर्वीच पुनावाला यांनी स्पष्ट केलंय. 

काय म्हणाले आदर पुनावाला?
आदर पुनावाला यांनी नुकतच एक ट्विट केलं असून, त्यात त्यांनी भारतातील एकूण लसीकरणासाठी 80 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं म्हटलंय. पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडे पुढील वर्षभरासाठी 80 हजार कोटी रुपये आहेत का? कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहचवण्यासाठी इतके पैसे लागणार आहेत. देशापुढचे हे सगळ्यांत मोठे आव्हान असणार आहे. हे ट्विट करताना, पुनावाल यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विट टॅग केले आहे. 

भारतातील स्थिती काय?
भारताची लोकसंख्या एक अब्ज 30 कोटींच्याही पुढे गेली आहे. भारतात गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. सध्या भारतात सध्या 9 लाखांवर कोरोनाचे ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 85 हजार 362 रुग्णांची वाढ झाली आहे. भारतातील एकूण कोरोना रुणांचा आकडा 59 लाखांच्या वर गेला आहे. देशात 24 तासांत 1 हजार जणांचा बळी गेला असून एकूण बळींची संख्या 93 हजार 379 वर गेली आहे.  देशात आतापर्यंत 48 लाख 49 हजार रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. या परिस्थितीमुळं देशात कोरोनाची लस आल्यानंतर काय होणार? याची उत्सुकता लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! अपात्र गुरुजींचा दुर्गम भागात ‘कोंबडा’; सातारा जिल्ह्यातील १८५ जणांना शिक्षेची बदली..

मोठी बातमी! राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांची बॅंक खाती ‘एनपीए’मध्ये; शेतकरी कर्जमाफीसाठी लागतात ३५,५७७ कोटी; हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीचा निर्णय

Satara Doctor Case: 'गाेपाल बदने, प्रशांत बनकरच्‍या पोलिस कोठडीत वाढ'; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायालयात नेमकं काय घडलं?

Sweet Corn Appe Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत स्वीटकॉर्न अप्पे, सोपी आहे रेसिपी

आता नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून! महापालिका निवडणुकीत 9 लाख तर झेडपीसाठी उमेदवारांना करता येणार 7.50 लाखाचा खर्च; पंचायत समितीसाठी 5.25 लाखांची मर्यादा

SCROLL FOR NEXT