India-China Border Sakal Media
देश

भारत-चीन दरम्यान चर्चेची १३ वी फेरीही निष्फळ

चर्चेअंती कोणताही तोडगा न निघाल्याने दोन्ही बाजूंनी सोमवारी सकाळी स्वतंत्र निवेदन जारी करण्यात आले.

ओमकार वाबळे

भारत आणि चीनदरम्यान कॉर्प्स कमांडर पातळीवर पार पडणारे चर्चासत्र संपले आहे. मात्र, चर्चेची १३वे फेरीही निष्फळ ठरल्याने सीमावर्ती भागात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. गलवान खोऱ्यात चीनने सैन्य तैनात केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध चिघळायला सुरुवात झाली. यानंतर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र चीनच्या कुरघोड्यांनी यामध्ये अडथळे येत आहेत.

रविवारी झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या 13 व्या फेरीत हॉट स्प्रिंग्समध्ये पॅट्रोलिंग पॉइंट्स (पीपी) 15 पासून संदर्भात चर्चा झाली. मात्र चर्चेअंती कोणताही तोडगा न निघाल्याने दोन्ही बाजूंनी सोमवारी सकाळी स्वतंत्र निवेदन जारी करण्यात आले. सीमावर्ती भागात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी दोन्ही देशांनी एकमेकांना दोषी ठरवले. यथास्थिती बदलण्याच्या चीनच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे हा गोंधळ झाल्याचे भारताने म्हटले. तर, भारताने कठीण परिस्थितीत निर्माण केल्याचा आरोप चीनने केला.

एलएसीच्या बाजूने यथास्थिती बदलण्याच्या चीन सरकारच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे द्विपक्षीय करारांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परिपत्रक जारी करत असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. पश्चिम लडाख प्रांतात शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने पावलं उचलावी, असे यामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे.

रविवारी चुशुल-मोल्डो सीमावर्ती भागातील कोर कमांडर स्तरावरील बैठक आयोजित करण्यात आली होती. लडाखच्या पूर्वेकडील प्रांतात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही बाजूंच्या कमांडर्सने समस्यांचे निराकरण करण्यावर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT