Hamas
Hamas esakal
देश

Hamas : हमासला कोणते देश दहशतवादी संघटना मानतात, भारताची भूमिका काय आहे?

सकाळ डिजिटल टीम

Hamas : हमास ही दहशतवादी संघटना आहे की नाही हा मुद्दा पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. तुर्कीने हमासला दहशतवादी गट म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. या विधानानंतर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. जगातील अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानतात तर काही जण त्यांना स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना म्हणतात.

इस्रायलही याला दहशतवादी संघटना मानतो. नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन म्हणाले की, आता वेळ आली आहे की इतर अनेक देशांप्रमाणे भारतानेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे. दहशतवादाविरोधातील मोहीम राबवण्यात इस्रायलला मदत केल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले.

सध्या भारताने इस्रायलच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही, मात्र पंतप्रधान मोदींनी 7 ऑक्टोबरला केलेल्या ट्विटमध्ये इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. अशा परिस्थितीत हमासला दहशतवादी संघटना मानणारे कोणते देश आहेत आणि कोणते देश हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय.

अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत पाश्चात्य देशांनी हमासला दहशतवादी गट म्हणून घोषित केलंय.अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, जपान आणि युरोपीय देशांनी हमासला अधिकृतपणे दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. याशिवाय या देशांच्या प्रादेशिक गटांचीही हमासबाबत अशीच विचारसरणी आहे. या देशांच्या नेत्यांनीही हमासबाबत वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नुकतेच सांगितले की, या हल्ल्याला हमासचे समर्थन करणारे देखील जबाबदार आहेत. ते स्वातंत्र्यसैनिक नाहीत. ते दहशतवादी आहेत. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या भाषणात सांगितले की, ऑस्ट्रेलिया दहशतवादाच्या विरोधात आहे. आम्ही इस्रायलसोबत आहोत. हमासच्या हल्ल्याचा आम्ही निर्विवादपणे निषेध करतो. त्यांनी अंदाधुंद रॉकेट डागले, नागरिकांना लक्ष्य केले आणि ओलीस ठेवले.

जे देश हमासला दहशतवादी गट मानत नाहीत असे अनेक देश आहेत जे हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत. यामध्ये चीन, तुर्की, इजिप्त, कतार, रशिया, सीरिया, ब्राझील आणि इराण यांचा समावेश आहे. ही दहशतवादी संघटना नसून सैनिकांचा समूह आहे, असे त्यांचे मत आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी हमास ही दहशतवादी संघटना नसून मुक्ती संघटना असल्याचे वक्तव्य केले आहे. ते आपली जमीन मिळवण्यासाठी बचाव करत आहे. मुस्लीम देशांनी युद्धबंदीसाठी प्रयत्न करावेत, असे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. यासोबतच इस्रायलचे गाझावरील हल्ले थांबवण्याचे आवाहन त्यांनी जागतिक महासत्तांना केले आहे.

हमासच्या मुद्द्यावरून देशांची मत का विभागली ?

हमास हा दहशतवादी गट आहे की नाही या मुद्द्यावर जगातील अनेक देशांची मते विभागली आहेत. याचे कारण हमासची मागणी. ज्याला काही देश समर्थन देतात. हमास इस्रायलचे अस्तित्व नाकारतो, त्यामुळेच ते नेहमी त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. काही देशांचा असा विश्वास आहे की ते आपल्या हक्कांसाठी आणि जमिनीसाठी लढत आहे.

त्याचबरोबर हमास ज्या पद्धतीने काम करते, विनाश घडवते आणि निरपराधांचे रक्त सांडते त्यामुळे अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी गट घोषित केले. आता त्याची कमान इस्माईल हानीह यांच्या हातात आहे ज्यांना या संघटनेचा सर्वोच्च नेता म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT