saving
saving 
देश

देशात बचतीचे प्रमाण घटले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बचतीलाही बसला आहे. देशातील बचतीचे प्रमाण १५ वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरले आहे. नागरिकांकडून करण्यात येत असलेली घरगुती बचतही खालावली आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. आधीच गुंतवणुकीचा अभाव आणि बाहेरून कर्जरूपाने भांडवल उभारण्यात येत असल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असताना बचतीत घट झाल्याचा फटकाही देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. विविध गृहोपयोगी वस्तू आणि प्रवासावरील खर्च वाढला असल्यामुळे नागरिकांची घरगुती बचत कमी झाली आहे.

देशाच्या एकूण बचतीच्या ६० टक्के इतकी बचत नागरिकांच्या घरगुती बचतीद्वारे होते. मात्र, असे असतानाही ब्राझीलसारख्या इतर उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा भारतालाच प्राधान्य मिळत आहे. भारताला दीर्घकालीन शाश्‍वत विकास करायचा असेल, तर गुंतवणुकीचे प्रमाण वाढायला हवे. देशांतर्गत बचत खालावत असेल, तर भारत सरकारला परकी भांडवलाकडे वळावे लागेल, असे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ वर्षात भारताची एकूण बचत घटून एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) ३०.१ टक्‍क्‍यांवर ती आली आहे. २०११-१२ या वर्षात हेच प्रमाण ३४.६ टक्के आणि २००७-०८ या आर्थिक वर्षात ३६ टक्के इतके होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Jayanta Patil: सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र... जयंत पाटलांचा मोठा खुलासा

IPL 2024 : पराभव विसरा, पुढच्या तयारीला लागा... कर्णधारने सहकाऱ्यांना दिला मोठा सल्ला

Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

Latest Marathi News Update: प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT