Covaxin Sakal
देश

डेल्टाविरुद्ध कोव्हॅक्सिन ६५.२ टक्के प्रभावी; भारत बायोटेकची माहिती

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे अधिकृत निष्कर्ष भारत बायोटेकने जारी केले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोव्हॅक्सिन लस (Covaxin Vaccine) कोरोना विषाणूविरुद्ध (Coronavirus) लढण्यासाठी ७८ टक्के प्रभावी ठरते व घातक अशा डेल्टा व्हेरियंटच्या (Delta Varient) विरुद्ध ती ६५.२ टक्के प्रभावी ठरते,असे तिसऱ्या व अंतिम चाचणीतून आढळून आल्याची माहिती भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने दिली आहे. (Covaxin is Effective against Delta Bharat Biotech Information)

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे अधिकृत निष्कर्ष भारत बायोटेकने जारी केले. जानेवारीत कोव्हॅक्सिनच्या तीन चाचण्या होण्यापूर्वीच केंद्राने या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती. त्यानंतर भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशातील २५ केंद्रांवर १८ ते ९८ वयोगटातील २५ हजार ८०० जणांवर लसीच्या चाचण्या घेतल्या. यात सहभागी स्वयंसेवकांना लसीचे दोन्ही डोस दिल्यावर दोन आठवडे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवली. त्या निष्कर्षानुसार कोव्हॅक्सिन लस गंभीर संक्रमणाविरुद्ध तब्बल ९३.४ टक्के प्रभावी ठरते, असे चाचण्यांत आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना रुग्णांवर विषाणूचा दुष्प्रभाव रोखण्यासाठी ती ७७.८ टक्के व लक्षणे न आढळणाऱ्या रुग्णांसाठी ती ६३ टक्के प्रभावी ठरते. केंद्र सरकारने यंदा जानेवारीत कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती. मात्र तिन्ही चाचण्या पूर्ण न होताच लसीला परवानगी दिल्याबद्दल सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील अनेक डॉक्टरांनीही ही लस टोचून घेण्यास नकार दिला होता. अनेक राज्यांनीही या लसीबाबत नकारार्थी सूर लावला होता. ही लस मेड इन इंडिया कोविड-१९ लस म्हणून ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT