Covaxin Sakal
देश

Covaxinला मिळू शकते मंजूरी; 26 ऑक्टोबरला WHOची बैठक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला (Covaxin) ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापराला मंजूरी मिळू शकते. याबाबत WHO ची महत्त्वाची बैठक येत्या 26 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीमध्ये हैद्राबादमधील भारत बायोटेकची कोरोना लस कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्याबाबत विचार होणार आहे. WHOच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी काल रविवारी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, तांत्रिक सल्लागार समूहाची 26 ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्याबाबत विचार होईल.

WHO कडून सुरुय पडताळणी

सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय की, आमचं ध्येय आहे की लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळवून मोठ्या प्रमाणावर ती उपलब्ध करुन देणे. याआधी या महिन्याच्या सुरुवातीलाच WHO ने ट्विट करुन सांगितलं होतं की, कोव्हॅक्सिन सातत्याने यासंदर्भातील डेटा उपलब्ध करुन देत आहे. 27 सप्टेंबरला अतिरिक्त माहिती दिली गेली. WHO चे विशेषज्ज्ञ सध्या या माहितीची पडताळणी करत आहेत. ही लस आवश्यक त्या सगळ्या नियमांना खरी उतरतेय अथवा नाही, याबाबतची तपासणी सुरु आहे.

कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेकने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) सोबत मिळून विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन ही एक इनएक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे, जी आजार उत्पन्न करणाऱ्या व्हायरसला निष्क्रिय करुन तयार केली आहे. भारत बायोटेकने आपल्या लसीसाठी 19 एप्रिलला एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टचा अर्ज दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT