Covid JN.1 Variant Esakal
देश

Covid JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा तब्बल ११ राज्यांमध्ये शिरकाव; आरोग्य मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा

देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात पसरायला सुरुवात झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात पसरायला सुरुवात झाली आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ११ नव्या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात JN.1 च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असं आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान देशात JN.1 व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळून आले होते.

या राज्यांमध्ये संसर्ग पोहोचला

INSACOG व्यतिरिक्त, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने देखील आरोग्य मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की JN.1 चे संक्रमण देशातील 11 राज्यांमध्ये पोहोचले आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त, गोवा, पुद्दुचेरी, गुजरात, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, ज्यांच्या नमुन्यांचा जीनोम अनुक्रम अहवालाची प्रतीक्षा आहे.

देशभरात कोरोना रुग्णातही मोठी वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी कोरोनाचे ३५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे संसर्गामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमध्ये ३, कर्नाटकात २ आणि पंजाबमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

JN.1 व्हेरिएंटची लक्षणे कसे ओळखाल?

‘जेएन.१’ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्याने नागरिकांनी वेळीच सतर्क होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं सांगण्यात आलं आहे. जेएन १ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी, तो किती घातक आहे याबाबत अजूनही ठोस पुरावे मिळाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Vilas Ghule Case : सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याआधी बीडमध्ये खळबळ;विलास घुले यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Blistering Heat : शहरी भागांत उष्णतेच्या झळा तीव्र; ३४ वर्षांत ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT