Covaxin Side Effects Esakal
देश

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Covaxin Side Effects: काही दिवासांपूर्वी दिग्गज फार्मा कंपनी एस्ट्राझेनकाने लंडनमधील न्यायालयात कबूल केले होते की, त्यांच्या लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यानंतर खळबळ उडाली होती.

आशुतोष मसगौंडे

एस्ट्राझेनकाची Covid-19 लस Covishield वादात सापडल्याच्या काही आठवड्यांनंतर, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनमुळेही काही दुष्परिणाम होत असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले. संशोधकांनी शोधून काढले आहे की, ज्या किशोरवयीन मुलींना ऍलर्जीचा इतिहास होता त्यांना कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर AESI होण्याचा धोका जास्त आहे.

याप्रकरणाचा अहवाल स्प्रिंगरलिंकवर प्रकाशित करण्यात आला आहे. भारत बायोटेकच्या लसीच्या दुष्परिणामांवरील निरीक्षणात्मक अभ्यासात AESI सारख्या प्रतिकूल घटनांची नोंद झाली आहे.

दरम्यान काही दिवासांपूर्वी दिग्गज फार्मा कंपनी एस्ट्राझेनकाने लंडनमधील न्यायालयात कबूल केले होते की, त्यांच्या लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यानंतर खळबळ उडाली होती.

1,024 लोकांचा समावेश असलेल्या या अभ्यासात, केवळ 635 किशोरवयीन आणि 291 प्रौढ व्यक्तींना एका वर्षाच्या फॉलोअपमध्ये संपर्क साधता आला.

यामध्ये असे आढळून आले की, 303 पौगंडावस्थेतील आणि 124 प्रौढांमध्ये व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची नोंद झाली आहे.

हा अभ्यास सांख शुभ्रा चक्रवर्ती आणि बनारस हिंदू विद्यापीठातील तज्ञांनी केला होता आणि त्यात असे आढळून आले की, बहुतेक AESI एक वर्षानंतरही टिकून आहे.

संशोधकांना रुग्णांमध्ये खालील गोष्टी आढळल्या:

  • सामान्य विकार - 10.2%

  • त्वचा आणि त्वचेखालील विकार - 10.5%

  • मस्कुलोस्केलेटल विकार - 5.8%

  • मज्जासंस्थेचे विकार - 5.5%

  • महिलांमध्ये, 4.6% ने मासिक पाळीतील असामान्यता.

गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णांना गुइलेन-बॅरे सिंड्रोम आणि स्ट्रोकचा त्रास होतो. परंतु हे अनुक्रमे फक्त 1% आणि 0.3% प्रकरणांमध्ये होते.

याव्यतिरिक्त, अभ्यासात सहभागी झालेल्यांमध्ये ऍलर्जीचा इतिहास असलेल्या काहींना, विशेषतः स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींमध्ये टायफॉइडची प्रकरणे नोंदवली गेली.

कॉमोरबिडीटीस असलेल्या प्रौढांना सतत AESI चा सामना करण्याची शक्यता दुप्पट आहे. परंतु हे देखील लक्षात आले की, प्रतिकूल घटनांचे नमुने प्रौढ आणि किशोरवयीन मुलींमध्ये भिन्न आहेत. उच्चरक्तदाब असलेल्या प्रौढांना लसीकरणानंतर AESI चा जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Australia relations: ऑस्ट्रेलियाचं भारताला समर्थन; 'टॅरिफ'बद्दल भूमिका काय? चीनची भीती की...

Income Tax: भारताने केला नवा विक्रम! देशातील लोक कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा जास्त कर भरतात; अहवालात उघड

‘My Bappa Stories with Sakal’ : तुमच्या गणपती बाप्पाची खास गोष्ट सांगण्याची संधी, सकाळवर झळकणार तुमचे रील्स शिवाय जिंका खास बक्षिसे

Video Viral: एका माशीमुळे खेळाडूने जिंकले तब्बल १७ कोटी रुपये, पाहा नेमकं काय झालं?

Alandi Ganesh Festival : आळंदी नगर परिषदेची पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम हौदांची व्यवस्था, गणेश विसर्जनासाठी नवा उपक्रम

SCROLL FOR NEXT