corona update sakal Media
देश

Covid-19 Death rate : भारतीयांच्या आहाराच्या सवयींमुळेच देशातला कोरोना मृत्यूदर कमी; अभ्यासातून आलं समोर

महामारीच्या काळात, लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या देशांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

वैष्णवी कारंजकर

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की भारतातील कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान कमी मृत्यू झाल्याचं कारण म्हणजे भारतीयांचा आहार आहे.

१३ एप्रिल रोजी प्रथम प्रकाशित झालेल्या या संशोधनात ब्राझील, जॉर्डन, स्वित्झर्लंड, सौदी अरेबिया आणि भारतातील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाचा समावेश होता. अभ्यासाचे लेखक, डॉ. देबमाल्य बारह आणि प्रोफेसर निर्मल कुमार गांगुली, जे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी महासंचालक देखील होते. त्यांनी उघड केलं आहे की लसीकरण आणि इतर उपायांव्यतिरिक्त, भारतीय अन्न सवयी आणि अन्न घटकांनी कदाचित एक भूमिका बजावली आहे. भारतीयांमध्ये कोविड-१९ मुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची तीव्रता आणि शक्यता कमी करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे.

संशोधकांच्या मते, महामारीच्या काळात, लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या देशांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रति 100,000 लोकांमागे (1/100,000) मृत्यू दर तपासताना असं आढळून आलं की, प्रति चौरस किलोमीटर 428 लोकसंख्येची घनता असलेल्या भारताचा मृत्यू दर पाश्चात्य देशांच्या तुलनेत 5 ते 8 पट कमी आहे. संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे.

अभ्यासासाठी, संशोधकांनी दोन गट केले - कमी मृत्यू दर (39-40 मृत्यू/100,000) देश आणि उच्च मृत्यू दर (225-300 मृत्यू/100,000) देश. भारत पहिल्या गटात होता, तर अमेरिका, ग्रीस आणि स्पेन हे देश नंतरच्या गटात होते. त्यानंतर संशोधकांनी संबंधित देशांच्या राष्ट्रीय स्तरावर या दोन गटांमधील प्रमुख पदार्थ/मसाले/पोषक घटकांचा दरडोई रोजचा वापर ओळखला. भाजीपाला, संपूर्ण धान्य, शेंगा, लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अल्कोहोल, कॉफी, फळे, नट, चहा आणि हळद यासारखे बारा पदार्थ/मसाले/पोषक घटक हे गटांमधील महत्त्वाचे बदल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT