Lockdown Sakal
देश

Covid-19 Lockdown : कोरोना रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावावा का? पाहा जनता काय म्हणते?

राज्य तसंच केंद्रीय स्तरावरही कोरोना रोखण्याबाबत बैठका होत आहेत, तर विमानतळावर चाचण्याही सुरू कऱण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्रासह राज्य सरकार सतर्क झालं असून कोरोनापासून वाचण्यासाठी पुन्हा त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. तसंच टास्क फोर्स नेमण्याच्या सूचनाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तर केंद्रीय स्तरावरही कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठका होत आहेत.

दरम्यान, 'सकाळ'ने या उपाययोजनांबाबत जनतेचं मत विचारात घेण्याचा प्रयत्न केला. कोरोना रोखण्याचा उपाय म्हणून लॉकडाऊन लावावा का यासाठी 'सकाळ'कडून ट्वीटर पोल घेण्यात आला. या पोलला युजर्सने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे.

६७.४ टक्के लोकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडऊनमुळे गरीब जनतेचे हाल होत आहेत, त्यामुळे लॉकडाऊन नको, अशा आशयाच्या कमेंट्सही त्यांनी केल्या आहेत. तर ३२.६ टक्के लोकांना लॉकडाऊन लावण्याची गरज वाटत आहे. गरज पडल्यास लॉकडाऊन जरुर लावावा. तसंच आंतरराष्ट्रीय विमानांवरही बंदी घालावी, असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT