कोरोना ई सकाळ
देश

दुसरी लाट आटोक्यात, मृतांची संख्या तीन हजारांच्या खाली

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus 2nd Wave) भारतात हाह:कार माजवला होता. पण आता कोरोना महामारी हळू हळू आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. दररोज वाढणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. तसेच कोरोना मृताची संख्यामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे (Covid-19 in India) नवीन 1.27 लाख रुग्ण आढळले आहेत. तर मृताची संख्या 2,795 झाली आहे. 36 दिवसांत पहिल्यांदाच मृताची संख्या तीन हजारांच्या खाली आली आहे.

मागील 24 तासांत देशात एक लाख 27 हजार 510 नवीन कोरोना रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली आहे. यादरम्यान 2795 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 81 लाख 75 हजार 044 झाली आहे. आतापर्यंत तीन लाख 31 हजार 895 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिनाभरानंतर कोरोना मृताच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. याआधी 26 एप्रिल रोजी 2764 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत 19 मे रोजी मृताच्या संख्येनं उच्चांक ओलांडला होता. या दिवशी 4529 जणांचा मृत्यू झाला होता. सात मे रोजी देशात सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली होती. या दिवशी 4 लाख 14 हजार 188 जणांना कोरोना झाला होता.

मागील 24 तासांत देशात 2.55 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. लागोपाठ 19 व्या दिवशी कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. लागोपाठ 19 दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी 39 लाख 59 हजार 629 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 18 लाख 95 हजार 520 रुग्ण उपचाराधीन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT