ICMR Study Covid Vaccine eSakal
देश

Sudden Death : भारतातील तरुणांमध्ये अचानक मृत्यूचं कारण कोरोना लसीकरण नाही; ICMRच्या संशोधनात समोर आलं सत्य!

Covid Vaccination : कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी भारताने जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान राबवलं होतं.

Sudesh

ICMR on Sudden Deaths Among Young Adults : कोरोना लसीकरणामुळे युवकांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढल्याचा आरोप गेले काही महिने करण्यात येत होता. मात्र, आता कोरोना प्रतिबंधक लस आणि या अचानक होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे. याला इतर आजार आणि लाईफस्टाईलमधील बदल कारणीभूत असल्याचंही ICMRने सांगितलं आहे.

कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी भारताने जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान राबवलं होतं. देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन अब्जांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मात्र, यानंतर देशातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं होतं. लसीकरणामुळे हे होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ICMR ने या सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे.

संशोधनात समोर आलं सत्य

आयसीएमआरने म्हटलं आहे, की अचानक होणाऱ्या मृत्यूला लस कारणीभूत नाही. तर आधी कोरोना झालेला असणे, मृत्यूपूर्वी 48 तासांमध्ये दारुचं सेवन केलेलं असणे, ड्रग्सचं सेवन किंवा अती-व्यायाम अशा काही कारणांमुळे हे अचानक मृत्यू झाले असण्याची शक्यता या संशोधनात वर्तवण्यात आली आहे.

1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये देशभरातील 47 रुग्णालयांचा अभ्यास करुन हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील निरोगी व्यक्तींचा देखील समावेश करण्यात आला होता. ज्यांनी कोविड लसीचे दोन डोस घेतले होते, अशा लोकांना अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका अगदी कमी असल्याचं यात दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT