Luv Aggarwal
Luv Aggarwal Esakal
देश

जगभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, भारतात काय परिस्थिती ; जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

जगभरामध्ये कोरोना (Covid 19 )रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दररोज दिवसभरात सुमारे १५,००,०० इतके संखेची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे (Union Health Ministry) संयुक्त सचिव लव अग्रवाल (Luv Aggarwal) यांनी दिली. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Ministry of Health Covid 19 Update)

जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या ०.७ टक्के असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.

आता प्रत्येक देशांनी याची याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. काही देशांमध्ये या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे तर भारतात हे प्रमाण कमी दिसू लागले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भारतात दर आठवड्याला सरासरी ११,०० नविन रुग्णांची नोंद होत आहे. जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या ०.७ टक्के असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.

ते म्हणाले, इतर देशांच्या तुलनेत भारतात २८ फेब्रुवारीपर्यंत ६१५ मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १४४ आहे. केरळ, महाराष्ट्र, मिझोराममध्ये एकूण ५० टक्के रूग्ण सक्रिय आहेत. केरळमध्ये १०,००० पेक्षा जास्त केसेस आहेत. तर महाराष्ट्र आणि मिझोरम या दोन राज्यात पाच ते दहा हजार रूग्ण संख्या आहे.

भारतात आठवड्याचा दर सराररी दर हा ०.९९ टक्के आहे. सध्या देशात ७७ हजार रूग्णसंख्या आहे. गेल्या २४ तासात भारतात फक्त ६५६१ रूग्णांची नोंद झाली आहे. असेही लव अग्रवाल यांनी सांगितले.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही ट्विट करत माहिती दिली आहे. आतापर्यंत ९७ टक्के पेक्षा जास्त प्रौढांना लसीची पहिला डोस देण्यात आला आहे. १०० टक्के डोस देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणा संदर्भात बोलताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले, मृत्यू रोखण्यासाठी लसीची क्षमता मोजली आहे. यामुळे कोरोनातून वाचण्यासाठी लसीकरण गरजेच आहे.लस ट्रॅकर असलेला भारत हा दुसरा देश आहे. २०२२ मध्ये ९२ टक्के मृत्यू हे लसीकरण न झालेल्यांचे झाले आहेत असे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. नीति आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल म्हणाले, शेकडो जीवांचे रक्षण करण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. लसीकरणाने देशाला वाचवले असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT