covid in india Latest omicron variants on rise mask protocol to remain in force in india  Esakal
देश

जगभर पुन्हा पसरतोय कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट; भारतात प्रशासन अलर्ट

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पुन्हा एकदा वेग पकडत आहे. काही देशांमध्ये याची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे पाहता भारतात मास्क प्रोटोकॉल लागू राहणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी देशातील कोरोना विषाणूची परिस्थिती आणि सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेतली.

ओमिक्रॉन स्ट्रेनचे सब-व्हेरिएंट वेगाने पसरत आहेत .नवीन व्हेरियंटही येत आहेत. पाहता, मास्क आणि कोरोना काळात नागरिकांसाठीचे वर्तनाचे नियम देशभरात सुरू राहतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक राजीव बहल, NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) चे अध्यक्ष एनके अरोरा आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश.एस गोखले यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, राज्यांमध्ये, गेल्या आठवड्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये 17.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या नवीन कोविड प्रकरणांमध्ये XBB चा देखील समावेश आहे. XBB हा Omicron व्हेरिएंटचा नवीन सब व्हेरिएंट आहे, जो केरळसह देशातील इतर काही भागांमध्ये देखील आढळला आहे. याशिवाय, Omicron- BA.2.3.20 आणि BQ.1 चे इतर सब व्हेरिएंट देखील महाराष्ट्रात आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,542 नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर, देशातील एकूण संक्रमितांची संख्या 4,46,32,430 वर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वात कमी दैनंदिन प्रकरणे आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार उपचाराधीन रुग्णांची संख्या 26449 पर्यंत खाली आली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.06 टक्के आहे.गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 385 ने घट झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT