desh sakal
देश

तृणमूलच्या ‘लक्ष्मी भांडार’ला माकपची मदत

जनतेला अर्ज भरण्यास मदत करण्यासाठी ‘लाल सैनिकां’कडून शिबिर

श्‍यामल रॉय : सकाळ न्यूज नेटवर्क

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा एकेकाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) विद्यार्थी आणि युवा विभागाने गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या काळात जनतेच्या मदतीसाठी ‘लाल स्वयंसेवकांची’ची फौज उभी केली होती. हेच स्वयंसेवक आता तृणमूल सरकारच्या लोकप्रिय ‘लक्ष्मी भांडार’ योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज भरून घेत आहेत. (National News)

कुटुंबप्रमुख असलेल्या महिलांना ५०० ते १००० रुपयांची मदत केली जाईल, असे तृणमूलच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचारावेळी दिले होते. महिला कुटुंब चालवतात, पण त्यांच्या हातात फारसे पैसे येत नाहीत, असे ममतांचे म्हणणे होते. या निवडणूकीत तृणमूलचा प्रचंड विजय झाला, तर माकपला एकही जागा मिळाली नाही. तृणमूलच्या विजयात ममतांनी जाहीर केलेल्या योजनेचा मोठा वाटा असल्याचे माकपला वाटते. तृणमूलच्या या ‘लक्ष्मी भांडार’ योजनेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी मनाई करूनही भाजपचेही अनेक कार्यकर्ते योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत थांबल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळविण्यासाठीच्या तृणमूल सरकारच्या योजनेअंतर्गत घोष यांच्या कुटुंबीयांनीही आरोग्य कार्ड मिळविले होते.

प्रतिमा सुधारणेचा प्रयत्न

‘लक्ष्मी भांडार’ योजनेला प्रतिसाद मिळत असताना पाहून माकपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना या योजनेसाठीचे अर्ज भरून देण्यास मदत करत आहे. याद्वारे जनतेमधील त्यांची प्रतिमा सुधारण्याचा माकपचा प्रयत्न आहे. माकपने मात्र याचा इन्कार केला आहे. ‘आमच्या या मदतकार्याकडे कोणीही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. कोरोना संसर्गाच्या काळातही आम्ही जनतेला मदत केली होती,’ असे माकप नेत्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT