देश

Crime News:नवी कार खरेदी करण्यावरुन पती पत्नीत वाद ! पतीने असं काही केलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल

कार घेण्यावरुन पती-पत्नीत वाद झाला. या वादातून शिक्षक पतीने आपल्या पत्नीची हत्या केली.

Manoj Bhalerao

Crime News:एका ३० वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी अटक केली. हा व्यक्ती एक शिक्षक आहे आणि त्याचं कार घेण्याच्या कारणावरुन बायकोशी भांडण झालं होतं.

पोलिसांनी सांगितलं की संशयित सुर्यकांत तिवारी याने आधी आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर ही आत्महत्या आहे, असं दर्शवण्यासाठी बायकोचा मृतदेह पेटवून दिला. मात्र, जेव्हा शरीरविच्छेदनाचा अहवाल समोर आला, तेव्हा त्याचं पितळ उघडं पडलं. पोलिसांकडून सांगण्यात आलं की,"शवविच्छेदन अहवालात समोर आलं की महिलेच्या डोक्यावर आधी जड वस्तुने आघात करण्यात आला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या मृतदेहाला आग लावण्यात आली. "

पोलिसांनी केलल्या प्राथमिक तपासातून समोर आलं की या जोडप्याच ४ महिन्यांधी लग्न झालं होतं. ते मूळचे उत्तरप्रदेशचे होते आणि ते कोलकाता या ठिकाणी राहत होते. १७ ऑक्टोबरच्या दिवशी पोलिसांना माहिती देण्यात आली की एका फ्लॅटमधून धूर येत आहे. जेव्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिवारींनी सांगितलं की त्यांची पत्नी दिप्ती शुक्लाने आत्महत्या केली.

पत्नीने स्वत:ला आग लावत आत्महत्या केली, असा बनाव त्याने रचला. मात्र, पोलिसांना त्याच्या स्टेटमेंटमध्ये विसंगतपणा दिसून येत होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि संशयिताला प्रश्न केले.

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर हे उघड झाले की ही आत्महत्या नसून खून आहे. त्यानंतर संशयित पतीची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की त्याचे पत्नीशी कार खरेदी करण्यावरुन भांडणं झाली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT