Rohith Vemula 
देश

Rohit Vemula: "आरोपींना शिक्षा होणारच!" रोहित वेमुला मृत्यूप्रकरणी CM रेवंथ रेड्डींचा इशारा

या प्रकरणात हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरु, स्मृती इराणी आणि बंडारु दत्तात्रेय या आरोपींना तेलंगाणा पोलिसांनी नुकतीच क्लीनचीट दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा स्कॉलर विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणात हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरु, स्मृती इराणी आणि बंडारु दत्तात्रेय या आरोपींना तेलंगणा पोलिसांनी नुकतीच क्लीनचीट दिली. या प्रकरणावर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी भाष्य केलं आहे. आरोपींना शिक्षा होणारच असं त्यांनी म्हटलं आहे. (Culprits will be punished Telangana CM Revanth Reddy on Rohith Vemula case)

रोहित वेमुला हा दलित समाजातील नाही, असा अहवाल देताना त्यानं आपली जात उघड होईल या भीतीतून आत्महत्या केली होती, अशी टिप्पणी तेलंगणा पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये कोर्टात सादर केली होती. याद्वारे याप्रकरणी कथित आरोपी असलेल्या भाजपच्या खासदार आणि तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी, बंडारु दत्तात्रेय आणि हैदराबाद विद्यापीठीचे तत्कालीन कुलगुरु यांना क्लीनचीट दिली होती. (Latest Marathi News)

पण तेलंगाणा पोलिसांच्या या अहवालाविरोधात रोहित वेमुला याच्या भावानं हा खोटा अहवाल असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची भेट घेतली होती. तसेच तेलंगाणाचे पोलीस महासंचालकांनी सांगितलं की आम्ही याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करुन याप्रकरणाच्या फेरचौकशीची मागणी करु असं म्हटलं होतं. तर रोहितची आई राधिका वेमुला यांनी सांगितलं होतं की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासनं दिलं आहे की, या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल आणि सरकार आम्हाला न्याय देईल. (Marathi Tajya Batmya)

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?

दरम्यान, या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सांगितलं की, या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जाईल. तसेच यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT