cyclone biparjoy rainfall in gujarat saurashtra kutch pakistan 15 june evening imd red alert amit shah
cyclone biparjoy rainfall in gujarat saurashtra kutch pakistan 15 june evening imd red alert amit shah sakal
देश

Cyclone Biparjoy : सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातेत मुसळधार; अमित शहांकडून हवाई पाहणी

सकाळ वृत्तसेवा

भूज/द्वारका : बिपोरजॉय चक्रीवादळ पुढे सरकलेले असताना ३६ तासांनी सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पालनपूर, थराद, बनासकांठा, पाटण, अंबाजी जिल्ह्यातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची हवाई पाहणी केली.

दरम्यान, आज सकाळी कच्छ जिल्ह्यातील काही भागात व्यवहार सुरळीत सुरू झाले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविल्याने आणि वीजपुरवठा सुरू केल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे पावसामुळे पाटण येथील गुजरातचे सर्वात मोठे चारणका सोलर प्लँटचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्लँटमध्ये गुडघाभर पाणी झाले आहे.

चक्रीवादळामुळे सोलर पॅनल वाकले आहेत. स्थानिक नद्यांना पूर आल्याने पाटणच्या शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. बनासकांठा जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून बनास नदीचे पाणी आता आबू रस्त्यावर आले आहे. पालनपूर-अंबाजी महामार्ग बंद करण्यात आला आहे. डझनभर गावांना पाण्याचा वेढा पडला आहे.

पालनपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. शक्तीपीठ अंबाजी येथे पूरस्थिती असल्याने राजस्थान आणि गुजरातच्या भाविकांना परत जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. थराद शहरात ८० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहे.

बिपोरजॉय चक्रीवादळामुळे कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, मोरबी, जुनागड, गीर सोमनाथ, राजकोट आणि पोरबंदर येथे वीजसेवा सुरळीत करण्यासाठी ११२७ पथके नियुक्त करण्यात आले आहेत.

त्याचवेळी चक्रीवादळामुळे रस्त्यावर पडलेले सुमारे ५८१ झाडे बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली. बिपोरजॉयच्या तडाख्यातून वाचण्यासाठी कच्छ जिल्ह्यातील सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहेत. आज सकाळी ८.३० वाजता बिपोरजॉय चक्रीवादळ हे दक्षिण बारमेरपासून ८० किलोमीटर अंतरावर होते.

राजस्थानला पावसाचा तडाखा

जयपूर: बिपोरजॉयमुळे राजस्थानच्या काही भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. बाडमेर, माउंट आबू, सिरोही, उदयपूर, जालौर, जोधपूर, नागोर येथे आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. ५० ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत होते.

बाडमेर येथे पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आहे. खराब हवामानामुळे ११ केव्ही वीज वाहिनी तुटल्याने बंजाकुंडी येथील गावात १६ वर्षीय पूजा कुमावत नावाच्या युवतीचा मृत्यू झाला.

जालौर, सिरोही, बाडमेर येथे बिपोरजॉयचा सर्वाधिक परिणाम दिसत आहेत. माउंट आबू येथे विक्रमी ८.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. जयपूरच्या वेधशाळेने सिरोही आणि जालोर येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच काही भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आली आहे.

राजस्थानात रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित

पावसामुळे आणि पूरजन्य स्थितीमुळे बाडमेरहून जाणाऱ्या चौदा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच उदयपूरहून दिल्ली आणि मुंबईची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानलगत असलेल्या बाडमेरच्या पाच गावांतील पाच हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

बिपोरजॉयचा ८० टक्के परिणाम राजस्थानमध्ये जाणवत असून अनेक भागात पाऊस पडत आहे. काल रात्री चुरुच्या बिदासर येथे ७६ मिलीमीटर पाऊस पडला. सिरोहीच्या अनेक भागात ६२ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहिले. काल रात्री बिपोरजॉयचे वादळ राजस्थानला धडकले. त्याचा परिणाम रविवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस पडत आहे. जोधपूरमध्ये मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला आहे. जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, जिम, पर्यटन स्थळ आणि समर कॅम्प काही दिवसांसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT