देश

दैनिक भास्करने केली 700 कोटींची कर चोरी - आयकर विभाग

सूरज यादव

आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर हे राजकीय सूड भावनेतून होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला होता.

नवी दिल्ली - आयकर विभागाने दैनिक भास्कर ग्रुपच्या अनेक कार्यालयावर धाड टाकली होती. करचोरी प्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचं त्यावेळी आय़कर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. आता याबाबत माहिती समोर येत असून आयकर विभागाने शनिवारी सांगितलं की, दैनिक भास्कर ग्रुपवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये जवळपास 700 कोटी रुपयांची कर चोरी, शेअर बाजाराच्या नियमांचे उल्लंघन आणि यादीतील कंपन्यांकडून लाभात फेरफार केल्याचे पुरावे सापडले आहेत. कर चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजुनही या प्रकरणाची चौकशी आय़कर विभागाकडून केली जात आहे.

आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर हे राजकीय सूड भावनेतून होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला होता. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धाडीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावर अनेक कंपन्या चालवल्या जात असल्याची माहिती आय़कर विभागाने दिली आहे. या कंपन्यांचा वापर बनावट खर्चाचे बूकिंग आणि इतर व्यवहारांसाठी केला जात होता.

काही कर्मचाऱ्यांना भागधारक आणि संचालकही करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांनी मान्य केलं आहे की, त्यांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या कंपन्यांबाबत कोणतीही माहिती त्यांना नाही. तसंच त्यांनी आधार कार्ड आणि डिजिटल स्वाक्षरी कंपनीला विश्वासाने दिले होते. काही नातेवाईक असेही आढळले ज्यांनी स्वत:हून आणि जाणीवपूर्वक कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. मात्र त्यांना ज्या कंपन्यांचे संचालक, भागधारक केले होते तिथं काय चालतं याची माहिती दिली नव्हती.

आयकर विभागाने सांगितलं की, बनावट कंपन्यांचा वापर खोटा खर्च दाखवण्यासाठी, तसंच कंपन्यांच्या नफ्यात फेरफार करणं यासाठी करण्यात आला. या कंपन्यांबाबत सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचंही आढळून आलं आहे. निनावी व्यवहारांचीसुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचं आयकर विभागाने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT