महिलांच्या सुरक्षेसाठी केरळ सरकारचा ‘पिंक प्रोटेक्शन’ उपक्रम

महिलांचा हुंड्याशी संबंधित छळ, सायबर बुलिंग तसेच सार्वजनिक ठिकाणावरील अत्याचार रोखण्यासाठी ‘पिंक प्रोटेक्शन’ हा उपक्रम केरळ सरकारने हाती घेतला आहे.
Pink Protection Project
Pink Protection ProjectSakal

तिरुअनंतपूरम - कोरोनामुळे (Corona) लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) महिलांवरील अत्याचाराचे (Atrocities against Women) प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक, खासगी तसेच माहिती - तंत्रज्ञानाच्या ठिकाणी महिलांच्या अधिकारांचे रक्षण (Security) करण्यासाठी केरळ सरकारने (Keral Government) आज सर्वसमावेशक ‘पिंक प्रोटेक्शन’ (Pink Protection) उपक्रमाची घोषणा केली. (Government of Keralas Pink Protection Initiative for Womens Safety)

महिलांचा हुंड्याशी संबंधित छळ, सायबर बुलिंग तसेच सार्वजनिक ठिकाणावरील अत्याचार रोखण्यासाठी ‘पिंक प्रोटेक्शन’ हा उपक्रम केरळ सरकारने हाती घेतला आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सध्याची गस्तीची प्रणालीही मजबूत केली जाईल.

Pink Protection Project
स्वांतत्र्याच्या शंभरीत भारत अमेरिका-चीनच्या बरोबरीनं उभा असेल - मुकेश अंबानी

मुख्यमंत्री पी. विजयन यांनी येथील पोलिस मुख्यालयासमोर या उपक्रमातंर्गत अधिकाऱ्यांना दिलेल्या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. पोलिस अधिकाऱ्यांना महिला संरक्षणासाठी दहा मोटारी, ४० दुचाकी आणि २० सायकली राज्य सरकारने दिल्या आहेत. यावेळी पोलिस महासंचालक अनिल कांत यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

घरोघर जाऊन माहिती घेणार

‘पिंक प्रोटेक्शन’ अंतर्गत गुलाबी वेशातील ‘जनमैत्री’ या विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक प्रत्यक्ष घरी जाऊन कौटुंबिक हिंसाचाराची माहिती घेईल. त्याचप्रमाणे, पथक पंचायत सदस्य आणि स्थानिकांकडूनही याबाबत माहिती घेईल. त्यानंतर, पथकाकडून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल. पथकातील प्रशिक्षित अधिकारी सार्वजनिक ठिकाणी हजर राहून समाजकंटकांवर लक्ष ठेवतील. त्याचप्रमाणे, केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांत नियंत्रण कक्षाची स्थापनाही केली आहे. ‘पिंक रोमिओ’ या महिला पथकाची सरकारने यापूर्वीच स्थापना केली आहे.

लॉकडाउन काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे,‘पिंक प्रोटेक्शन’ सारख्या योजनेतून या समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे.

- पी.विजयन, मुख्यमंत्री, केरळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com