dalai lama viral video controversy know tradition with tongue tibet unique Sticking out ones tongue tradition  
देश

Dalai Lama News : दलाई लामा यांचा 'तो' वादग्रस्त व्हिडिओ अन् तिबेटमधील 'ती' विचित्र परंपरा

रोहित कणसे

दलाई लामा यांच्या व्हिडिओमध्ये ते एका लहान मुलासमोरजीभ बाहेर काढताना आणि अल्पवयीन मुलाला ती चोखण्यास सांगतांना दिसत आहेत. ही व्हिडीओ क्लिप ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली. (dalai lama viral video controversy)

मात्र काही रिपोर्टमध्ये दावा केला जातो की दलाई लामा यांनी केलेलं हे कृत्य तिबेटी परंपरेतील परंपरेचा भाग आहे. जीभ बाहेर काढणे हे पारंपारिक तिबेटी अभिवादन करण्याची पध्दत असल्याचं म्हटलं जात आहे.

आपण आज ही नेमकी परंपरा काय आहे? याचा इतिहास काय आहे हे जाणून घेणार आहोत.

काय आहे सत्य?

खरंच अशी काही परंपरा आहे का? तर हो, जीभ दाखवून स्वागत करण्याची अनोखी परंपरा तिबेटमध्ये पाहायला मिळते. ही परंपरा येथे असंख्य दिवसांपासून सुरू आहे. तब्बल ९ व्या शतकात तिबेट मध्ये एक क्रूर राजा लंगडरमा राज्य करत होता. त्याची जीभ काळी होती. त्यामुळे तिबेटी लोक जेव्हा नवीन व्यक्तीला भेटतात तेव्हा जीभ दाखवून या राजाशी आपला कसलाही संबंध नाही हे सांगतात. ही परंपरा आजही सुरू आहे.

दलाई लामा यांनी काय म्हटलंय?

वादग्रस्त व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना दलाई लामा यांच्या कार्यालयानं म्हटलं की, "एक व्हिडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा दलाई लामा यांना मिठी मारता येईल का? असे विचारतो. पण त्यांच्या या कृतीमुळं कोणी दुखावलं गेलं असेल तर तो मुलगा, त्याचे कुटुंबीय तसेच जगभरातील आपल्या अनेक मित्रांची दलाई लामा माफी मागू इच्छितात. दलाई लामा सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यांसमोरही भेटीसाठी आलेल्या सर्वांशीच अगदी निष्पापपणे आणि खेळकरपणे खोडी काढत असतात. पण या घटनेमुळं वाद निर्माण झाल्यानं दलाई लामा खेद व्यक्त करत आहेत,"

'त्या' व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दलाई लामा यांच्याप्रती आदर व्यक्त करताना दिसतो आहे. यावेळी दलाई लामा त्याच्या ओठांच चुंबन घेतात. यानंतर काही वेळाने ते त्याला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT