Zaira Wasim
Zaira Wasim 
देश

'दंगल' गर्ल झायरची विमानात छेडछाड; रडू कोसळले

वृत्तसंस्था

मुंबई - दंगल चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका करणारी झायरा वसीमला विमान प्रवासादरम्यान छेडछाडीला समोरे जावे लागले. या घटनेची माहिती सांगताना तिला रडू कोसळले. 

मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटात गीता फोगाटची भूमिका करणाऱ्या झायरा वसीमच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. झायराशी विमानामध्ये असभ्य वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. झायराने इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली आहे. झायरा नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तार एअरलाइनन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत एका सहप्रवाशाने असभ्य वर्तन केले. 

झायराने दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओत विमानात होत असलेली छेडछाड तिने दाखविली आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओत या बाबतची माहिती देताना तिला रडू कोसळल्याचे दिसत आहे. नवी दिल्ली-मुंबई प्रवास करत असताना तिच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशानं तिच्यासोबत छेडछाड केली. याबाबत विमानातील क्रू कडे तक्रार केली. मात्र, फ्लाइट क्रूने तिची कोणतीही मदत केली नाही. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिला अश्रू अनावर झाले. संबंधित प्रवाशावर आता कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

माझ्या मागील सीटवर बसलेला एक वयस्कर वयाचा व्यक्ती कमी प्रकाशाचा फायदा घेत माझ्याशी असभ्य वर्तन करत आहे. ती व्यक्ती पायानं माझ्या मानेला आणि पाठीला घासत आहे. मी त्याला विरोध केला. त्याला गोंधळ करण्याची धमकी दिली. तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. मी या सर्व गोष्टीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र लाइट कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही, असे तिने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT