dead lizard found famous restaurant food connaught place delhi case registered
dead lizard found famous restaurant food connaught place delhi case registered 
देश

ईईई! सांबारमध्ये आढळली मेलेली पाल; व्हिडिओ झाला व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील कॅनॉट प्लेस  (Connaught Place) परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये खाण्यात मेलेली पाल (Lizard)सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनॉट प्लेस परिसरातील सरवना भवन हे प्रसिद्ध रेस्टॉरंट सध्या सोशल मीडियावर काल रात्रीपासून चर्चेत आहे. रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती जेवण करत असताना, ताटातील सांबारमध्ये मेलेली पाल आढळून आली आहे. संबंधित ग्राहकाने तातडीने त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी ग्राहकाने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. पण, संबंधिताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

नागपुरातही घडला होता प्रकार
गेल्या वर्षी नागपूरमध्ये हल्दिरामच्या एका प्रसिद्ध आउटलेटमध्ये एका ग्राहकाला खाण्यात मेलेली पाल आढळली होती. वडा सांबारमध्ये ती पाल आढळली होती. दोघा जणांनी तो वडा सांबार खाल्ला होता. संबंधित महिला आणि त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि रेस्टॉरंटमधील जेवण फेकून देण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT