नवी दिल्ली - भारताच्या जी-20 प्रेसिडेन्सीच्या लोगोमध्ये कमळाच्या फुलाचा वापर करण्यावरून देशात वाद सुरू झाला आहे. त्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अजब विधान केलं आहे. कमळ हे आपले राष्ट्रीय असून भारताच्या संस्कृतीचे प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं. (defense minister rajnath singh over lotus on g20 logo controversy)
भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने कमळाचे फूल वापरण्यावर आक्षेप घेण्यात येतोय. मात्र देशाला मुक्त करण्यासाठी 1857 मध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी एका हातात कमळाचे फूल आणि एका हातात भाकरी घेऊन स्वातंत्र्यलढा दिला. राजनाथ म्हणाले की, आरोप करण्यासही मर्यादा आहे. कमळाच्या फुलाला भारत सरकारने १९५० मध्ये आपले राष्ट्रीय फूल घोषित केले होते. त्याचे कारण म्हणजे कमळाचे फूल या देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे.
"1857 मध्ये जेव्हा पहिले स्वातंत्र्ययुद्ध लढले गेले, तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांनी एका हातात भाकरी आणि एका हातात कमळाचे फूल घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला. केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपल्या सांस्कृतिक चिन्हांबाबतही वाद निर्माण केला जात आहे. जे आपल्या भारताच्या सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित आपली प्रतीकं आहे. टीका करण्यासही काही मर्यादा असतात, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
जी-20 लोगोमधील कमळाच्या फुलावरून काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. जी-20 लोगोमध्ये भाजपचे चिन्ह वापरण्यात आले आहे, हे धक्कादायक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. यावरून हे स्पष्ट होते की पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाला स्वत: ची जाहिरात करण्याची कोणतीही संधी गमावायची नाही, असही काँग्रेसने म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.