drdo 
देश

लष्करासाठी आणखी एक क्षेपणास्त्र; एका वेळी शंभर टार्गेट ट्रॅक करण्याची क्षमता 

वृत्तसंस्था

बालासोर, ओदीशा - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. क्युआरएसएएम असे या क्षेपणास्त्राच्या नावाचे संक्षिप्त रुप आहे. या क्षेपणास्त्रासाठी वापरले जाणारे रडार एकाच वेळी १०० लक्ष्य ट्रॅक करू शकते आणि सहा लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. 

या चाचणीबरोबरच लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पद्धतीच्या संशोधनात्मक चाचण्यांची डीआरडीओने पुर्तता केली. आता लवकरच लष्कराकडून वापराच्या चाचण्या सुरु होतील. हवाई दलाचे जवानही चाचण्या करतील. त्यानंतर हे क्षेपणास्त्र लष्करात समाविष्ट केले जाईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी चाचणी घेण्यात आली. निर्धारीत लक्ष्य क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या भेदले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे आहे क्षेपणास्त्र 
- दिर्घ रुप ः क्वीक रिअॅक्सन सरफेस टू एअर मिसाईल 
- जमिनीवरून हवेतील लक्ष्याविरुद्ध वेगवान प्रत्यूत्तर देण्याची क्षमता 
- भेदक क्षमतेचा पल्ला (स्ट्राईक रेंज) ः २५ ते ३० किलोमीटर 
- घन रुपातील इंधनावर चालते 
- वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्ये भेदण्याची क्षमता 
- लाँचर मोबाईल 
- १५ किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता 
- क्षेपणास्त्रासाठी दोन प्रकारच्या वाहनाची गरज 
- एक वाहन क्षेपणास्त्र वाहून नेणारे 
- दुसरे वाहन रडार वाहून नेणारे 
- एकीकडून दुसरीकडे नेण्याची क्षमता असल्यामुळे सैनिक ते घेऊन आगेकूच करू शकतात 
- हलविण्याच्या सुविधेमुळे शत्रुचे प्रतिआक्रमण चुकवणेही शक्य 
- या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ४ जून २०१७ रोजी झाली 
- उंचीची चाचणी चार जून २०१९ रोजी पूर्णत्वास 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: बंगला बदलल्याने नशीब बदललं? प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा गड कसा केला उद्ध्वस्त?

सोलापूर पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरात डीजे अन्‌ लेझर लाईट्सवर बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार 'बीएनएस' २०२३ मधील कलम १६३ नुसार कारवाई, वाचा...

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

पोलिस अधीक्षक म्हणाले..! आता अडचणीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामकची मदत एकाच कॉलवर; महिला, विद्यार्थी व एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी ‘हे’ ॲप, वाचा...

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

SCROLL FOR NEXT