नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी भाजपचे खासदार सनी देओल यांचा उत्तम नगर मतदारसंघात रोड शो आयोजित केला होता.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी भाजपचे खासदार सनी देओल यांचा उत्तम नगर मतदारसंघात रोड शो आयोजित केला होता. 
देश

दिल्ली विधानसभा प्रचाराची रणधुमाळी थांबली

पीटीआय

नवी दिल्ली - शाहिनबाग आंदोलनास भाजपकडून मुद्दा करण्याचा प्रयत्न, आप पक्षाकडून विकासकामाचे दावे आणि तुलनेने काँग्रेसची कमी उपस्थिती या पार्श्‍वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता थांबली. येत्या शनिवारी ७० जागांसाठी मतदान होत असून, मंगळवारी निकाल लागणार आहेत. 

शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सेलमपूर, हरिनगर आणि मादिपूर येथे रोड शो घेतले. आप पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या प्रतापगंज येथे पदयात्रा काढली.

प्रचारात भाजपने केंद्र सरकारने दिल्लीत केलेल्या विकासकामांचे मुद्दे मांडले, त्याचवेळी शाहिनबाग आंदोलनाचा मुद्दा त्यांनी प्रचारात ओढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या, तर गृहमंत्री अमित शहांच्या अनेक सभा झाल्या. याशिवाय भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वेगाने प्रचार करत शाहिनबाग आंदोलनाचे मुद्दे उपस्थित केले. भाजपचे खासदार, आमदार आणि सत्तारूढ राज्यातील मुख्यमंत्री विजय रूपानी, एन. बिरेन सिंह (मणिपूर), एम. एल. खट्टर (हरियाना) यांनीही भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पश्‍चिम दिल्लीचे भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचार गाजला, त्यामुळे या दोघांना अनुक्रमे ७२ आणि ९६ तासांसाठी प्रचाराची बंदी घातली. त्यानंतर स्टार प्रचारकांतून या दोघांना वगळले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT