Shashi Tharoor  Esakal
देश

Shashi Tharoor: शशी थरूर यांना धक्का, सहाय्यकाला दिल्ली विमानतळावर अटक; 'हा' गंंभीर गुन्हा गेल्याचा आरोप

Delhi Airport: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासाठी धक्काद्याक बातमी समोर आली आहे. बुधवारी दिल्ली विमानतळावर त्यांच्या सहाय्यकाला अटक करण्यात आली आहे.

आशुतोष मसगौंडे

बुधवारी दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कस्टम्सने काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या सहाय्यकाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कस्टम्सने सोने तस्करी प्रकरणी शशी थरूर यांच्या सहाय्यकाला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

दिल्ली कस्टम्सने शशी थरूर यांचे सहाय्यक शिवकुमार यांना अटक केली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी कस्टमने शिवकुमार यांना अटक केली आहे. सीमाशुल्क सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार आयजीआय विमानतळावर त्यांच्या एका माणसाकडून परदेशातून आणलेले सोने हस्तांतरित करत होते. त्यावेळी कस्टमने त्यांना पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरूर यांच्या सहाय्यकाकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे.

तो व्यक्ती दुबईहून येत असल्याचीही माहिती मिळाली आहे. आता कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी जप्त केले 1 किलो सोने

यापूर्वी, 28 मे रोजी IGI विमानतळ कस्टम्सने तीन श्रीलंकन ​​नागरिकांना अटक केली होती. सुमारे 1.23 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सोन्याच्या तस्करांबद्दल माहिती मिळाल्यावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एका आरोपीला काठमांडू फ्लाइटमधून दिल्लीत आल्यानंतर अटक केली.

अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता 55 लाख रुपये किमतीचे 860.38 ग्रॅम सोने सापडले. रविवारी कोलंबोहून आल्यानंतर श्रीलंकेच्या इतर दोन प्रवाशांना तपासणीसाठी थांबवण्यात आल्याचे विभागाने सांगितले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता 1.06 किलो सोने सापडले, ज्याची किंमत 67.82 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT