Manish Sisodia  esakal
देश

Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक; काय आहे प्रकरण?

संतोष कानडे

नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे.

दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली 'लीक' करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.

आज सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केलं की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे. "

यादरम्यान सिसोदिया यांचं मनोबल वाढवण्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर पोहोचले होते. सिसोदिया यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अखेर चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT