Viral Video  Sakal
देश

Viral Video : दिल्लीच्या पुरात महिला पत्रकार उतरली; थेट मानेपर्यंत पाणी अन् NDRF जवानांनी काढला Video

दत्ता लवांडे

दिल्ली : उत्तर भारतातील अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमध्ये पूर आला असून अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. या पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून झालेल्या गैरसोयीमुळे आप सरकार आणि भाजप सरकार यांच्यात आरोप प्रात्यारोप सुरू आहेत.

सध्या एका महिला पत्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती दिल्लीच्या पुरातील पाण्यात उतरून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. या महिला पत्रकाराच्या थेट मानेपर्यंत पाणी आलं असून तिने आपल्या संरक्षणासाठी हवा भरलेली ट्यूब घेतल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, तिच्या शेजारीच एनडीआरएफ जवानांची एक बोट असून या जवानांनीच या महिलेचे व्हिडिओ आणि फोटो काढले आहेत. तर संकट काळासाठी या पत्रकाराच्या जबाबदारीसाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

पाकिस्तानचा विनोदी पत्रकार चाँद नवाब याचा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असेल. तर पाण्यात उतरून रिपोर्टिंग करणाऱ्या अनेक पत्रकारांचे विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण दिल्लीच्या पुराचा प्रश्न गंभीर असून या पुराची भीषणता मोठी आहे. ही भीषणता दाखवण्यासाठी ही महिला पत्रकार थेट पाण्यात उतरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT